मूळ नाव - श्री. विष्णू भिकाजी गोखले
जन्म - २० जुलै १८२५ (नागपंचमी - श्रावण शु.५ शके १७४७)
जन्मगाव - शिरवली , तालुका - माणगाव , जिल्हा - रायगड, महाराष्ट्र
आई वडिलांची नावे - सौ. उमाबाई भिकाजी गोखले
श्री. भिकाजी महादजी गोखले
भिकाजीपंतांचा मृत्यू - १८३०
विष्णुबुवांचे मौंजीबंधन - १८३२ (वय ७ वर्षे)
लेखन, वाचन आणि कला शिक्षण - १८३४ (वय ९)
इंग्रज सरकारच्या जमीन - खात्यामध्ये वसुलाती विभागाच्या तालुका कचेरीत नोकरी - १८३४ - १८३५
शिरवली गावी आईच्या मदतीसाठी राहिले. - १८३६ - १८३७
महाडला किराणा दुकानात नोकरी - १८३८ - १८३९
रत्नागिरीस संगमेश्वर बंदरावर नोकरी - २ महिने
ठाण्याला सरकारी नोकरीची परीक्षा पास - १८४०
साष्टी, वसई, कल्याण, भिवंडी, उरण येथे कस्टम खात्यात नोकरी - १८४० - १८४७
उरणला दैवी दृष्टांत मिळाल्यावर नोकरीचा राजीनामा. साधुसंतांशी ज्ञानाच्या गोष्टी करत सदगुरुच्या शोधात भटकंती, १८४८ - १८४९
सप्तशृंगीच्या डोंगरावर एकांतवासात तपश्चर्या, ईश्वराचा साक्षात्कार, दत्तसंप्रदायी द्वादशकलात्मक ज्ञान प्राप्त - १८५० - १८५२
नाशिकला पंचवटीत काही दिवस मुक्काम आणि त्यानंतर पंढरपूर मुक्कामी ३ वेळा भावार्थ रामायणाचे पारायण. सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, नगर, कोल्हापूर इ. ठिकाणी वेदोक्त धर्माचे महत्व सांगणारी व्याख्याने. . - १८५३ - १८५६
'भावार्थ सिंधू ' या पंचप्रकरणात्मक पहिल्या ग्रंथाची निर्मिती - १८५६
द्वारकेस जाण्यासाठी मुंबईत काळबादेवीला आगमन - सप्टेंबर १८५६
ख्रिस्ती मत खंडन करण्यास धाकजी दादाजी यांच्या वाड्यात बैठका - सभा , परभू सेमिनरीमध्ये वेदोक्त धर्म प्रचारासाठी ५० सभा - ऑक्टोबर - डिसेंबर १८५६
गिरगाव चौपाटीवर ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वादविवाद सभा - १५ जानेवारी - २८ मे १८५७
मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते कलकत्ता, कलकत्ता ते काशी - धर्मोपदेश करण्यासाठी प्रवास
काशीस संन्यासाश्रम स्वीकारून परमहंस दीक्षा
पुन्हा कलकत्त्यास प्रयाण. कॉलऱ्याने आजारी, खानू नावाच्या मुस्लिमाकडून स्वयंपाक आणि शुश्रूषा करून घेतली .
मुंबईस आगमन - बोटीच्या प्रवासात ख्रिस्ती आचाऱ्याच्या हाताचे जेवण घेत.
‘वेदोक्त धर्मप्रकाश ‘ या ग्रंथाची निर्मिती - १८५९
विष्णुबुवा ब्रह्माचारींना अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराव यांनी अक्कलकोटला आणले. राजवाड्यात वेदान्तावर व्याख्याने आणि चर्चा केली. याच काळात स्वामी समर्थ आणि विष्णुबुवांची भेट - पुन्हा मुंबईस आगमन
‘चतुःश्लोकी भागवत याचा अर्थ’ -मराठी भाषेत गद्यामध्ये चतुःश्लोकी भागवताचा अर्थ लिहिला. - १८६७ मुंबई
सुखदायक राज्याप्रकारानी निबंध याची निर्मिती - १८६७ मुंबई
या निबंधाचे इंग्रजीत भाषांतर श्री. बाळ भास्कर शिंत्रे - ह्या मुंबई उच्च न्यायालयातील भाषांतरकाराने केले.
कॅप्टन फेल्प्स याच्याकडून ग्रंथ तपासून घेऊन १०,००० प्रति छापून देश विदेशातील गणमान्य व्यक्तींना पाठविला.
सहजस्थितीचा निबंध (१८६८)
विष्णुबुवांना धनुर्वाताचे दुखणे झाले. धनुर्वाताचे सर्व दुःख आणि शारीरिक सर्व दुःख सम करून लोकोपकारार्थ आणि मृत्यूचे भय वाटू नये आणि मृत्यू हा एक उत्तम विषयभोग आहे, या हेतूने सहजस्थितीचा निबंध (१८६८) लिहिला.
‘सेतुबंधनी टीका ‘ (१८७०)
बुद्धिवादी दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक परिभाषेत भगवद्गीतेवर केलेले भाष्य. अज्ञानातून मानवाला ज्ञानाकडे नेणारा सेतू (पूल) असे या टीका - लेखनाचे स्वरूप आहे
विष्णुबुवांचा मानेवरील काळपुळीच्यामुळे मृत्यू - १८ फेब्रुवारी १८७१