🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जि. रायगड
आज १० वी बोर्डाची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर मराठीचा आहे.
शालाबाह्य कातकरी मुलामुलींसाठी आपण पाटणसई वाडीवर (ता. रोहा) जून २०२३ पासून अभ्यासिका चालवितो. जून २०२४ पासून दुसऱ्या बॅचची सुरुवात झाली.
या अभ्यासिकेत शिकणारे विघ्नेश्वर पवार, धीरज पवार, सोनाली पवार आणि समीक्षा पवार यांना कोलाड येथील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी नागोठण्यातील कार्यकर्त्या आणि शिक्षिका सौ. श्वेताताई परांजपे गेल्या आहेत. सोबतच्या छायाचित्रात हे सर्व दिसत आहेत.
तुम्ही सर्व देणगीदार, हितचिंतक आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्यामुळे हे काम आपण करू शकतो आहे.
दि. १७ मार्चला शेवटच्या दिवशी भूगोलाचा पेपर आहे.
विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. 🪷🌸🌺
सुरेश गोखले
95793 72797