Mangaon, District - Raigad

29 Jul 2024 14:40:35

img
 
५ जुलै २०२४ . 

🕉️🕉️
🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा - रायगड.
सप्रेम नमस्कार. जय श्रीराम.
 
तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आपण रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील शिरवली (विष्णुबुवांचे जन्मगाव) परिसरातील ९ आणि रोहा तालुक्यातील ४ अशा एकूण १३ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील ५५९ गरजू विध्यार्थ्यांना शेक्षणिक मदत - पुस्तके, वह्या, रंगपेटी, कंपासपेटी, छत्र्या आणि गणवेश देऊ शकलो आहोत. तुम्ही केलेल्या आर्थिक साहाय्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडण्यास बहुमोल मदत होणार आहे. आणखी काही शाळांमध्ये वाटपाचे काम करायचे आहे आणि ते आठवडाभरात पूर्ण होईल.
ग्रामीण भागातील शाळांची दुरावस्था, प्रशासनाची अनास्था, दळणवळणाची अपुरी साधने, पालकांचे रोजगारासाठी स्थलांतर अशा अनेक गोष्टींमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या पट संख्येवर प्रतिकूल परिणाम होत असतो. या जोडीला गरिबी आणि संपर्काच्या अभावामुळे शाळेतून विद्यार्थी कायमचे तुटण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांनी स्वाभिमानाने आपल्या पायावर उभे राहावे यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र प्रयत्नशील आहे.
विष्णुबुवांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या या राष्ट्रीय कार्याला तुमचे प्रेम आणि सहकार्य सदैव लाभावे अशी प्रार्थना.
या वाटपाची निवडक छायाचित्रे सोबत पाठवत आहे.
अनेक शुभेच्छा. 🌺🌻
आपले,
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र
9579372797
वेबसाईट - vishnubuvabrahmachari.com
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र
Powered By Sangraha 9.0