२१ जून २०२४.
शैक्षणिक साहित्य वितरण प्रारंभ
आज वट पौणिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा. सकाळी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी शिरवली या त्यांच्या जन्मगावी स्थापिलेल्या श्रीदत्तगुरुंच्या पादुकांवर अभिषेक झाला. आजचे यजमान श्री. संजय तांबे (भैरीची वाडी, तालुका - माणगाव) होते.
त्यानंतर आम्ही सकाळी ११.३० वा. शिरवली जवळील कडापे गावच्या जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत गेलो. येथील मुलांचा पट ४० आहे. आज भरपूर पाऊस असल्याने अर्धी मुले गैरहजर होती. १९ मुलामुलींना वह्या, अन्य साहित्य आणि छत्र्या दिल्या. अन्य मुलांचे साहित्य शिक्षक वर्गाकडे देऊन ठेवले. श्री. सुरेश गोखले यांनी थोडक्यात विष्णुबुवांची माहिती सांगितली. यावेळी केंद्राचे उपाध्यक्ष श्री. सुनिलजी जगताप तसेच श्री. सुरेंद्रभाई पालांडे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भगवान भोसले, मुख्याध्यापिका सौ. मेघा साठे, श्री. कदम सर, श्री. निजापकर सर यांचे सहकार्य लाभले.
पुढील आठवड्यात सर्व वितरण करण्याचे नक्की केले आहे. त्याची माहिती आपणास वेळोवेळी कळवीन.
अनेक शुभेच्छा.