आज (दि. २६/०३/२०२४) चि. निलम पवार आणि चि. रोहन पवार (पाटणसई वाडी, तालुका रोहा) यांची इयत्ता १० वीची परीक्षा पार पडली. निलम आणि रोहन हे दोघे कातकरी या जनजातीतील असून अत्यंत विपरीत परिस्थितीत वाढले आहेत.
या दोघांना पाटणसई वाडीवर जाऊन ६ जणांनी मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलच्या माध्यमातून अनेक जणांनी सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हे दोघे १० वीच्या परीक्षेला बसू शकले.
निलम आणि रोहन यांनी केलेले परिश्रम आणि आपण या मुलांसाठी केलेली तयारी लक्षात घेऊन ऐनवेळी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेतली होती. दोघांना परीक्षा केंद्रावर कोलाडला सकाळी घेऊन जाणे आणि परीक्षा संपल्यावर परत घरी आणून सोडणे याची उत्तम व्यवस्था झाली होती.
लवकरच १० वीच्या नवीन तुकडीसाठी पाटणसई वाडीवर मार्गदर्शन वर्ग सुरू करायचा आहे. यावर्षी मुलामुलींची संख्या वाढावी असा प्रयत्न आहे.
अनेक शुभेच्छा.