शिरवली : पाठ्यपुस्तके, वह्या (लॉन्ग बुक) आणि छत्र्यांचे वितरण

19 Aug 2023 12:33:37

New-English School  
 
सप्रेम नमस्कार. जय श्रीराम.
 
तुम्हा सर्वांना कळवितांना आनंद होतो की दिनांक ५ जुलै २०२३ रोजी शिरवली येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतील इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्रा तर्फे पाठ्यपुस्तके, वह्या (लॉन्ग बुक) आणि छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
 
यामध्ये ९ वीच्या १६ आणि १० वीच्या २८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
 
त्याचप्रमाणे शिरवली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ५५ विद्यार्थ्यांना वह्या आणि छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे उपाध्यक्ष - श्री. सुनील जगताप, सचिव - श्री. सुरेश गोखले, सहसचिव - श्री. प्रभुदास घरत आणि विश्वस्त मंडळ सदस्य - सौ. प्रतिभाताई पोळेकर तसेच शिरवली ग्रामस्थ - समाजसेवक श्री. सुरेंद्रभाई पालांडे, श्री. अनंतबाबा पालांडे, श्री. संजीव परांजपे, श्री. अशोक शेळके तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी म्हात्रे सर, श्री. चौधरी सर, प्राथमिक शाळेचे श्री. निवृत्ती मगरे आणि अन्य शिक्षक उपस्थित होते.
 
श्री. प्रभुदास घरत, श्री. सुनील जगताप आणि सौ. प्रतिभाताई पोळेकर यांनी विष्णुबुवांचे जीवन आणि कार्य याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली आणि त्यांचे गुण अंगिकारण्याचे आवाहन केले. श्री. सुरेश गोखले यांच्या सोबत विद्यार्थ्यांनी एका अभंगाचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमाची सांगता जयघोषांनी झाली.
 
कार्यक्रमानंतर केंद्राचे कार्यकर्ते, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भावी कार्यक्रमांचे नियोजन करण्यासंबंधी चर्चा झाली.
 
आपणां देणगीदारांच्या अमूल्य सहकार्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ही मदत पोहोचवणे शक्य झाले.
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- पाठ्यपुस्तके, वह्या (लॉन्ग बुक) आणि छत्र्यांचे वितरण
 
 
धन्यवाद ! अनेक शुभेच्छा !
 
सुरेश गोखले
९५७९३७२७९७
Powered By Sangraha 9.0