आदर्श माध्यमिक विद्यालय, कुडली,

19 Aug 2023 12:14:08

upakram-2  
 
गुरुवार,
दिनांक २७ जुलै २०२३
 
जय श्रीराम.
 
आज आदर्श माध्यमिक विद्यालय, कुडली, तालुका - रोहा, जिल्हा - रायगड, या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राकडून वह्यांचे (लॉन्ग बुक) वाटप करण्यात आले. यावेळी पू. सनातन स्वामी (तिकोना पेठ, जिल्हा - पुणे) उपस्थित होते. याकामी मुख्याध्यपिका सौ. ज्योत्स्ना मुंडे आणि शिक्षकांचे उत्तम सहकार्य लाभले.
 
या शाळेत आंबिवली, कुडली , सरफळे वाडी या गावांतून विद्यार्थी येतात. आनंदाची गोष्ट अशी की या वर्षी शाळेतून अनुसूचित जमातीतील (कातकरी) २ मुली आणि ३ मुले १० वी उत्तीर्ण झाली आणि त्यांनी ११ वीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे कातकरी समाजात उत्साहाचे वातावरण आहे आणि कातकरी जमातीतील विदयार्थ्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. पालक, शिक्षक, ग्रामस्थ, शालेय समिती आणि संस्थाचालक अभिनंदनास पात्र आहेत.
 
समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येकाने शिकले पाहिजे, शासनाने तशी व्यवस्था उभी केली पाहिजे असे विष्णुबुवांचे आग्रहाचे सांगणे होते. विष्णुबुवांचा आदर्श समोर ठेवून गरीब, उपेक्षित मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आपण हातभार लावत आहोत.
 
आम्ही सर्वानी भारत देश महान आमुचा.. हे गीत सामूहिक गायिले. सर्व मुलांनी घरी नियमित श्लोक, आरती म्हणण्याचे ठरविले आहे.
 
आपण सर्वांच्या अमूल्य सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.
अनेक शुभेच्छा. 
 
 
सुरेश गोखले
95793 72797
Powered By Sangraha 9.0