गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

12 Aug 2023 16:00:52

kandalgaon


आज शुक्रवार, दिनांक 14 जुलै 2023 रोजी, कांदळगाव, तालुका - माणगाव, जिल्हा - रायगड येथील रायगड विद्या मंदिर या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्रा कडून छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वि. ब्र. सा. केंद्राचे उपाध्यक्ष श्री. सुनीलजी जगताप उपस्थित होते. याकामी शिक्षकांचे उत्तम सहकार्य लाभले.
 
ग्रामीण भागातील मराठी शाळांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. साधनांचा तुटवडा, शासनाचे दुर्लक्ष, वाढते शहरीकरण आणि गरिबी यांचा एकत्रित परिणाम म्हणजे शाळांची कमी होणारी विद्यार्थी पटसंख्या. संस्थाचालक आणि शिक्षक आपल्या परीने शक्ती लावून शाळा चालवत आहेत. करोना काळात मुले घरी राहिल्याने अभ्यासाचे खूप नुकसान झाले आहे. फार मोठ्या संख्येने मुलांनी शिक्षणाला कायमचा रामराम केला आहे.
 
समस्या अक्राळविक्राळ आहेत. परंतु प्रामाणिकपणे अविरत प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हातात आहे. यासाठी अनेक हातांची आवश्यकता आहे.
 
अनेक शुभेच्छा. 
सुरेश गोखले
95793 72797
Powered By Sangraha 9.0