विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र

20 Mar 2023 17:22:29

Karyalay

 
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राच्या माणगाव, जिल्हा रायगड येथील कार्यालयाचे सोमवार, २९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०. ०० वा. उद्घाटन झाले.
 
कार्यालयाच्या फलकाचे अनावरण आणि विष्णुबुवांच्या प्रतिमेचे पूजन पू . सनातन स्वामी (तिकोना पेठ, ता. मावळ, जिल्हा - पुणे) यांनी केले.
 
यावेळी विष्णुबुवांनी लिहिलेले विविध ग्रंथ, त्यांचे वर लिहिलेली अन्य लेखकांची पुस्तके आणि पी. एच . डी. चे प्रबंध मांडण्यात आले होते.
 
या कार्यक्रमासाठी माणगावचे नगराध्यक्ष श्री. ज्ञानदेवजी पवार, श्री. राजुशेठ साबळे, नगरसेवक, रा. स्व. संघाचे श्री. गाणेकर सर, न्यासाचे विश्वस्त - उपाध्यक्ष श्री. सुनील जगताप , खजिनदार श्री. नितीन बामगुडे , सदस्य सौ. प्रतिभा पोळेकर आणि विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
माणगाव येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. नितीनजी बामगुडे या न्यासाचे खजिनदार आहेत. त्यांनी स्वतःची जागा कार्यालयाला वापरण्यासाठी दिली आहे.
 
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र
 
कार्यालयाचा पत्ता -
 
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र,
२७७३ / १ - २, वंदन अपार्टमेंट,
कचेरी रोड, माणगाव
पिन - ४०२१०४
 
विष्णुबुवांच्या कार्यात सहभागी होण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी कार्यालयात संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0