४ जुलै २०१९ - एक अविस्मरणीय संध्याकाळ

20 Mar 2023 17:41:07

lecture-4-july

राष्ट्राच्या इतिहासात अनेक माणसे उत्तुंग अशी कामगिरी करून जातात. त्यातील काही जणांच्या नशिबात जनसामान्यांनी त्यांचे स्मरण करणे असते तर काही जण काळाच्या पडद्याआड विरून जातात. परंतु नियती अशी असते की त्यापैकी एखाद्याचे स्मरण लोक परत करू पाहतात, त्याचा इतिहास, त्याची कामगिरी जाणू इच्छितात. असे एक महापुरुष, रायगड जिल्ह्याचे सुपुत्र, काळाच्या प्रवाहाच्या विरोधात चालणारा क्रांतिकारक - द्रष्टा संन्यासी म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी.
 
विष्णुबुवांच्या जन्मगावी म्हणजे शिरवली येथे त्यांचे चरित्र जागविण्यासाठीश्री.सुधीर करंदीकर, पुणे यांचे ४ जुलै २०१९ ला रात्री ९.०० वा. व्याख्यान ठेवले होते. तत्पूर्वी वक्ते आणि इतर पाहुण्यांनी विष्णुबुवांनी स्थापन केलेल्या श्रीदत्तगुरुंच्या पादुकांचे दर्शन घेतले. पाऊस रिपरिप चालू होता. गावकरी उत्साहाने जमले होते. श्री. करंदीकरांनी विष्णुबुवांचे चरित्र, त्यांचे काळाच्या पुढे पाहणारे विचार, त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग यांचा आपल्या भाषणातून उहापोह केला. भविष्यात शिरवली हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होईल, त्यामुळे गावाचा - सभोवतालच्या परिसराचा विकास होईल, लोकांना रोजगार मिळेल असे विचार व्यक्त केले.
 
श्री. महेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सुरेंद्रभाई पालांडे यांनी वक्त्यांचे आणि पाहुण्यांचे आभार मानले. पसायदान होऊन कार्यक्रम पूर्ण झाला. या कार्यक्रमाला रायगड उत्सव समितीचे कार्यवाह श्री. सुधीरजी थोरात, विश्व हिंदू परिषदेचे श्री. सुरेश गोखले, श्री. राहुल तळकर, श्री. महेश मोरे, श्री. सतीश साठे, श्री. धनंजय गोखले, श्री. सुरेश गोखले उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0