न्यासाची उद्दीष्टे

22 Feb 2023 16:19:56

१. विष्णुबुवांचे साहित्य -


(अ) पुनर्मुद्रण - विष्णुबुवांच्या पुस्तकांची नव्याने छपाई करणे. त्यांचे भारतीय आणि इंग्रजी भाषेत अनुवाद करणे.

(ब) पुनर्लेखन - विष्णुबुवांच्या पुस्तकांचा अभ्यास करून, नवीन साधनांचा वापर करून नवीन पुस्तके लिहिणे आणि प्रकाशित करणे.

(क) डिजिटायझेशन - विष्णुबुवांच्या पुस्तकांचे आणि विष्णुबुवांच्या संबंधित महानुभावांच्या पुस्तकांचे डिजीटायझेशन करणे.

(ड) संशोधन - विष्णुबुवा आपल्या जीवन कार्यासाठी महाराष्ट्रात - महाड, भिवंडी, कल्याण, उरण, नाशिक, पंढरपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, अक्कलकोट, वाई, सांगली, सातारा, मुंबई इ. तसेच तामिळनाडूमध्ये - चेन्नई, पश्चिम बंगालमध्ये - कोलकत्ता , उत्तर प्रदेशमध्ये - वाराणसी आणि गुजरात येथे प्रवास केला आणि धर्मरक्षण, धर्मप्रसार आणि समाजसुधारणेसाठी भेटीगाठी, बैठका, चर्चा, सभा घेतल्या. त्यांच्या या कार्यासाठी संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

या संशोधन कार्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवक, युवतींनी संपर्क साधावा.

२. प्रबोधन -

 
१. भाषण, व्याख्यान, परिसंवाद, कीर्तन आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून
विष्णुबुवा आणि राष्ट्रपुरुषांचे चरित्र कथन करणे
२. परीक्षा - विष्णुबुवांचे चरित्र आणि जीवन कार्यावर शाळांमध्ये परीक्षा
घेणे
 

३. संघटन -

 
१. उत्साही युवक, युवती आणि नागरिकांच्या माध्यमातून गाव आणि शहर पातळीवर समूह तयार करणे. त्यांचेद्वारे व्यायाम, खेळ आणि प्रशिक्षण देणे.
 

४. संस्कार -

 
१. आरती, सत्संग
२. वैयक्तिक आणि पारिवारिक उपासना
 

५. सेवा -

 
१. शिक्षण -
२. आरोग्य - कुपोषित मुले, स्त्रिया, दिव्यांग
उपेक्षित - विधवा, जनजाती (आदिवासी)
बांधवांना आधार, प्रशिक्षण आणि रोजगार
३. निसर्ग संवर्धन, स्वच्छता
 
 
Powered By Sangraha 9.0