विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    13-Aug-2024
Total Views |

img
१० ऑगस्ट २०२४

🕉️

🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा - रायगड

मान्यवर,
सप्रेम नमस्कार. जय श्रीराम.

आज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाचा प्रारंभ झाला. विष्णुबुवांनी त्यांच्या जन्मगावी - शिरवली येथे स्थापन केलेल्या श्रीदत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. आजचे यजमान ह.भ.प. श्री. कृष्णामहाराज वाघमारे (सावरसई कातकरी वाडी) होते. शिरवलीचे गावकरी आणि थरमरी वाडीचे कातकरी बांधव अभिषेक आणि आरतीमध्ये सहभागी झाले होते.

नंतर शिरवली आणि कांदळगाव येथील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि नागरिकांनी - विष्णुबुवा महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय, वेदोक्त हिंदू धर्म की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय या घोषणांचा उद्घोष करीत जागरण फेरी केली.

शिरवली आणि कांदळगाव येथील माध्यमिक शाळा आणि शिरवली ग्रामस्थांना विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. अन्य संपर्कित शाळांना लवकरच प्रतिमा देण्यात येईल .

शिरवली गावच्या सार्वजनिक सभागृहात या कार्यक्रमाचा समारोप झाला. यामध्ये दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. सांघिक गीत झाल्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे उपाध्यक्ष श्री.सुनिलजी जगताप यांनी विष्णुबुवांचे जीवनावर उद्बोधक विचार मांडले. विद्यार्थ्यांनी विष्णुबुवांचा आदर्श ठेऊन आपले जीवन घडवावे आणि भारतमातेची सेवा करावी असे त्यांनी आवाहन केले. पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

१९९ वर्षांपुरी विष्णुबुवांच्या जन्माचे वेळी भरपूर पाऊस कोसळत होता असे त्यांच्या चरित्रकारांनी लिहिले आहे. आजही सकाळी शिरवलीमध्ये भरपूर पाऊस कोसळला.

सर्वाना हार्दिक शुभेच्छा. 🪷🪷🪷

सुरेश गोखले
९५७९३७२७९७
वेबसाईट - vishnubuvabrahmachari.com
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र