व्याख्यान १८ नोव्हेंबर २०२२

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |

Lecture-nov-18

'हिंदू धर्म रक्षक आणि प्रचारक विष्णु बुवा ब्रम्हचारी' या विषयावर विष्णुबुवा ब्रम्हचारी सामाजिक केंद्राचे सचिव श्री. सुरेश गोखले यांचे दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, पुणे येथे व्याख्यान झाले.
 
सौ. स्मिता देसाई आणि श्री. हेमंत देसाई यांनी बँक ऑफ बडोदा मधील निवृत्त कर्मचारी आणि अन्य मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
 
विष्णुबुवा ब्रम्हचारी या लोकोत्तर महापुरुषाने १९ व्या शतकात केलेल्या अलौकिक कार्याचे महत्त्व स्पष्ट करून सांगताना श्री. सुरेश गोखले यांनी विष्णु बुवा ब्रम्हचारी यांच्या साहित्याचा, त्यांनी मांडलेल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय विचारांचा आढावा घेतला. १९ व्या शतकात ब्रिटीश राजसत्तेच्या पाठिंब्याने हिंदूंचे आणि पारशी समाजाचे धर्मांतरण करणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांची कुटील नीती ओळखून विष्णुबुवांनी त्यांना आव्हान देऊन प्रतिकार केला आणि धर्मांतरे थांबविली.
 
याचबरोबर जातीभेद निर्मूलन, महिला आणि बहुजनांचे शिक्षण, समाज प्रबोधन यासाठी फार मोठे कार्य केले. आपण मूळ वेदोक्त धर्मापासून दूर जाऊन जातीभेद आणि कर्मकांडाच्या पाशात अडकलो आणि पारतंत्र्यात गेलो, असे त्यांचे वस्तुनिष्ठ विचार होते. वेदोक्त धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी विष्णुबुवांनी महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी तसेच कलकत्ता , चेन्नई, वाराणसी याठिकाणी प्रवास केला. स्वकीयांची आणि परकीयांची टीका झेलून ते आपले इप्सित कार्य ठामपणे करत राहिले. त्यांचे विविध ८ ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. विष्णुबुवांचे यासंबंधीचे १५० वर्षांपूर्वीचे विचार आणि कार्य आजही औचित्यपूर्ण आहेत.
 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्मिता देसाई यांनी केले. कार्यक्रमाला ८० पेक्षा अधिक श्रोते उपस्थित होते.
 
विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, स्वरूप वर्धिनी तसेच अन्य सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- हिंदू धर्मरक्षक आणि प्रचारक विष्णुबुवा ब्रह्मचारी