शिरवली गावी जन्मलेले, रायगड जिल्ह्याचे सुपुत्र श्री. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे महाशिवरात्र , १८ फेब्रुवारी २०२३ ला त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्मरण करण्यात आले.
सकाळी विष्णुबुवा ब्रह्मचारी स्थापित श्रीदत्तगुरुंच्या पादुकांवर अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली. यावेळचे यजमान श्री. जितेंद्रभाऊ मढवी होते.
श्री.अनंतबाबा पालांडे यांच्या घरी शिवलीलामृताचे पारायण करण्यात आले. गावकरी मोठ्या संख्येने श्रवण आणि प्रसादासाठी आले होते. श्री. अनंतबाबा पालांडे गेले अनेक वर्षे पारायण करीत आहेत.
संध्याकाळी ७.०० ते ९.०० या कालावधीत विठ्ठल रखुमाई मंदिरात ‘ नवनूतन भजनी मंडळ, रोहे ‘ यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सौ. मेघना ओक आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी अतिशय सुश्राव्य अशी भजने म्हटली. गावकरी - स्रिया, पुरुष, मुली मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांनी भजने ऐकताना टाळ्यांचा ताल धरून साथ दिली. विष्णुबुवा सामाजिक केंद्राचे सचिव श्री. सुरेश गोखले यांनी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य याबद्दल आपले विचार मांडले.
शेवटी आरती, प्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- श्री. विष्णुबुवा ब्रह्मचारी पुण्यतिथी