पितृपक्षात अन्नदान वाटप

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |

Distribution of alms in Pitrupaksha
 
 
आपल्या परंपरेत व संस्कृतीत या पितृपक्षाचे खुप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीवर आपल्या देशाचे, धर्माचे, समाजाचे, पूर्वजांचे, नातेवाईक यांचे खुप काही देणे असतेच असते. त्यांचे मुळेच आज आपण येथ पर्यंत पोहचलो आहोत. हे ऋण मान्य करणे व त्याचे स्मरण करणे, त्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणजेच ऋण- विमोचन. या ऋणातून आपण कधीही पूर्णतः मुक्त होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक वर्षी पितृपक्षाचे निमित्ताने या सर्व उपकाराची, मदतीची जाणीव मनात ठेवून काहीतरी दान करणे हा मार्ग आपल्या संस्कृतीत आहे. ऋण मान्य करून त्याचे स्मरण ठेवून त्यातून उतराई होण्याची आपली परंपरा नंतर सर्व जगाने स्वीकारली आहे.
 
शनिवार, १७ सप्टेंबर रोजी माणगाव आणि शिरवली येथे एकूण ६० अपंग , मतिमंद , गरीब , निराधार बांधवाना अन्नधान्य - शिधावाटप करण्यात आले. शबरी सेवा समितीने अन्नधान्य - शिधा उपलब्ध करून दिला.
 
या वाटपाची सर्व व्यवस्था विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र यांनी केली होती. यावेळी शबरी सेवा समितीचे सचिव श्री. प्रमोदराव करंदीकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे विश्वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
शिरवली हे गाव पू. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचे जन्मगाव आहे. जवळजवळ १५० /१७५ वर्षांपूर्वी विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी खिश्चन मिशन-यांशी संघर्ष केला, त्या महापुरुषाचे या योगे स्मरण करण्यात आले. 
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- अन्नदान वाटप