विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन समाजप्रबोधन आणि समाजसेवेच्या माध्यमातून बलिष्ठ भारताच्या उभारणीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे ध्येय समोर ठेवून चैत्र शुद्ध पंचमी- लक्ष्मी पंचमी (दि. ६ एप्रिल २०२२) ला 'विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र' न्यासाची स्थापना करण्यात आली.
या न्यासाच्या स्थापनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्वर्गीय श्री. मोरोपंत पिंगळे यांची प्रेरणा असून पूज्य श्री. सनातन स्वामी (मु. तिकोना पेठ, तालुका मावळ, पुणे ) यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले आहे.
विष्णुबुवांच्या जन्मगावी शिरवली (ता. माणगाव, जि. रायगड) येथे त्यांनी स्थापन केलेल्या श्रीदत्तगुरुंच्या पादुकांची दैनंदिन पूजा आणि पौर्णिमेला मासिक अभिषेक केला जातो.